भूत भानामती करणी मूठ । विज्ञान सांगते सारे झूट

हाच मंत्र जीवन समृद्ध करेल – विजय चौकेकर
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भूत भानामती करणी मूठ | विज्ञान सांगते सारे झूट । । हा मूल मंत्र दिला आहे . भूत अंगात येणे , भानामती करणे , करणी करणे , मूठ मारणे हे सर्व खोटे असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे . जर हे सत्य असेल तर सिद्ध करा आणि तीस लाख रुपये बक्षिस मिळवा असेही आवाहन केले आहे .मात्र आज अखेर हे सिद्ध करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाहीत . त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हीही या मंत्राचा जीवनात सतत घोष करा आणि तुमचे जीवन समृद्ध करा, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक मा.विजय चौकेकर यांनी केले.
जि. प . पूर्ण प्राथ केंद्रशाळा सुकळवाड , ता . मालवण येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC ) सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रात्यक्षिकासह व्याख्यानात ते बोलत होते .
यावेळी त्यांच्यासमवेत विचार मंचावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.सुनिल पाताडे सर , पं. स . मालवणचे माजी सभापती मा.प्रसाद मोरजकर सर , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा.श्री.विलास मसुरकर, मा.श्री.सुभाष चव्हाण,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बाळकृष्ण नांदोसकर सर , शिक्षक श्री.मधुकर बाचीपळे सर ,स्वयंसेवक श्रीम. सुवर्णा प्रभुखोत, स्वयंसेवक श्रीम.साक्षी गावडे व स्वयंसेवक श्री. रत्नदीपक परब आदी उपस्थित होते.
मा.विजय चौकेकर यांनी संपूर्ण कायद्याची विद्यार्थ्यांना , शिक्षकांना आणि पालकांना विविध प्रात्यक्षिकासह माहिती दिली . जादूटोणा विरोधी कायदा देव आणि धर्माच्या विरोधात नसल्याचे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे देव आणि धर्माच्या विरोधात कधीच नव्हते तर देव आणि धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या सर्व जाती धर्मातील भोंदू बाबांच्या विरोधातील होते , असे सांगितले .
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.सुनिल पाताडे सरांनी मा.विजय चौकेकर यांनी आपल्या शालेय जीवनात अनेक विद्यार्थांना सुसंस्कारित केले आणि आता सेवानिवृत्तीनंतरचा काळही समाज प्रबोधनासाठी खर्च करीत असून शाळा , विद्यालय , महाविद्यालय येथील मुलांना अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा या व्याख्यानमालेतून वैज्ञानिक पिढी घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत . त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाल ,श्रीफळ देऊन गौरवित असल्याचे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
उत्कंठवर्धक कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बाळकृष्ण नांदोसकर सरांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री.मधुकर बाचीपळे सरांनी केले.