आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने भाजपा दिव्यांग विकास आघाडीची बैठक संपन्न

सावंतवाडी – भाजपा जिल्हा कार्यालय,ओरोस वसंतस्मृती येथे भाजपा दिव्यांग आघाडीची बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने दिव्यांग आघाडीने प्रचार करताना लाभार्थीपर्यंत पोहोचून मोदी सरकार व शिंदे – फडणवीस सरकार ने दिव्यांगांसाठी दिलेल्या योजनांची माहीती द्यावी , असे मार्गदर्शन केले .

यावेळी दिव्यांग विकास आघाडी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी करण्यासाठी खारीचा वाटा उचलु असे अभिवचन दिले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई , जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई ,दिव्यांग आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रकाश वाघ , वैद्यकीय प्रभारी आरती बापट , कणकवली प्रभारी प्रशांत सावंत , शासकीय योजना प्रभारी तुळशीदास कासवकर , क्रीडा प्रभारी प्रशांत कदम , कुडाळ प्रभारी आश्विनी पालव , ५% अनुदान प्रभारी रमेश जाधव , कुडाळ तालुका संयोजक सुधीर चव्हाण , अनिल पालव इत्यादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!