हेत होळीचा मांड येथे “कोकणचा साज संगमेश्वरी बाज”

या धमाल विनोदी लोकनाट्या चे आयोजन

वैभववाडी – मु. पो. हेत, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग येथे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजता हेत होळीचा मांड येथे धमाल विनोदी लोकांनाट्य “कोकणचा साज संगमेश्वरी बाज” या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्वर्गीय उद्योजक श्री. रवींद्रनाथ गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री. रुपेश गुरव आणि गुरव परिवार यांनी याचे आयोजन केलेले आहे
हे लोकनाट्य संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले असून 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात गौरविलेले आहे
या लोकनाट्याचा हेत मध्ये होणारा 420 वा प्रयोग आहे.
सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा अशी विनंती हेत गावचे मेळेकरी, मानकरी आणि सर्व ग्रामस्थ यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!