कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची अशी देखील माणुसकी!

उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असताना पशु पक्षांना दिलासा देणारा उपक्रम

अधिकाऱ्या मधला माणूस आला सर्वांसमोर

जग म्हणजे नुसते मनुष्यानी भरलेले नसुन या जगामध्ये पशु ,पक्षी, प्राणी व निसर्गाचाही समावेश आहे. व याचाच विचार मनाशी धरत कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्यातील माणूस पण व माणुसकी देखील जपली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसहित जनतेला सुद्धा त्यांनी आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. आता सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जवळपास 40 अंश पेक्षा जास्त तापमानाचा पारा चढलेला आहे. उष्णतेने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. तसेच दुपारच्या वेळेस रस्त्यावर चिट पाखरु सुध्दा दिसुन येत नाही. प्रचंड तापमानामुळे कावळे,चिमण्या, छोटे छोटे पशु या उन्हाच्या झळामुळे पाणी अणि खाद्य मिळत नसल्यामुळे त्यांची संख्या रोडावत चालली आहे. अशावेळी एक छोटासा प्रयत्न म्हणून श्री सर्वगोड यांनी कणकवलीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पशु – पक्षी व प्राण्यांसाठी पाणी व खाण्याची व्यवस्था केली आहे. सां बा विभाग कणकवली येथील विश्राम गृहा जवळ राष्ट्रीय महामार्ग च्या लागत च्या गटारात एक कुत्री नी चार पिलांना जन्म दिला आहे. त्यांना पण या असाह्य उष्णतेच्या काळात सर्वगोड यांनी पाणी व खाण्याची व्यवस्था करत आपल्यातील माणुसकी जपली आहे. जेणेकरुन छोटे छोटे पक्षी अणि प्राणी तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे असा या पाठीमागचा असल्याचे ते सांगतात. आपण आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी निसर्गातील पशु – पक्षी आणि प्राण्यांची सुध्दा काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठीच म्हणुनच कि काय साने गुरुजी म्हणतात. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या उक्तीचे श्री सर्वगोड यांनी तंतोतंत आचरण करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!