पळसंब बंधाऱ्याच्या प्लेट चोरीप्रकरणी सखोल चौकशीची सरपंच महेश वरक यांची मागणी

पळसंब ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील खालची वाडी येथे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या प्लेट चोरी प्रकरणी पळसंब गावचे सरपंच .महेश बापू वरक,पोलीस पाटील.सीताराम नागेश सकपाळ यांनी भेट देवून पहाणी केली. यावेळी अरुण माने,,बाबू तर्फे,प्रभाकर वाघ,कमलेश साटम,आदी उपस्थित होते.
याबाबत सरपंच वरक यांनी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक.पोलीस निरीक्षक सुनील जाधवयांना या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याबाबत व कारवाई होण्याबाबत निवेदन दिले आहे.तसेच लघु पाटबंधारे विभाग,मालवण गटविकास अधिकारी (उच्चश्रेणी) यांना कारवाई बाबत पत्र देवून मागणी करण्यात आली आहे .पळसंब गावच्या या बंधाऱ्यातून पाणी अडवून त्या पाण्यावर बागायती शेती ,भाजीपाला केला जातो परंतु दिनांक 19 मार्च रोजी अज्ञात व्यक्तीकडून बंधाऱ्याच्या 18 प्लेटी चोरुन नेल्याच्या वरक यांच्या निदर्शनास आल्याचे वरक यांनी स्पष्ट केलेआहे.त्यामुळे पाण्याचा साठा कमी झालेला असून शेती बागायती साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे
आचरा–अर्जुन बापर्डेकर





