नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर…

लहान गटात -सांची पाटणकर तर मोठ्या गटात – रेवण राऊळ प्रथम
खारेपाटण नगर वाचनालय खारेपाटण यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने जाहीर करण्यात आला असून इयत्ता ३ री ते ५ वी या लहान गटात जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ ची इयत्ता ४ थी ची विद्यार्थिनी कु. सांची संतोष पाटणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला असून इयत्ता ६ वी ते ७ वी मोठ्या गटात शेठ न.म.विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील इयत्ता ६ वी चा विद्यार्थी कु.रेवण अनंत राऊळ यांने प्रथम क्रमांक मिळविला आहे.या दोन्ही विद्यार्थ्यांचे खारेपाटण हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री संजय सानप तसेच खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चे मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.तर सबंधित सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे घेण्यात आलेल्या या कथाकथन स्पर्धेचा निकाल नुकताच खारेपाटण नगर वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीम. मंगलाताई राणे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केला.तो पुढील प्रमाणे —-
इयत्ता ३ री ते ५ वी – (लहान गट) – प्रथम – कु.सांची संतोष पाटणकर, द्वितीय – कु.त्रिशा सिद्धेश तावडे, तृतीय – कु.दीक्षा किरण कर्ले, उतेजनार्थ – कु. सानिया मुबीन पावसकर, कु.सई लक्ष्मण काडगे,कु.संबोधी संदेश पाटणकर.
इयत्ता ६ वी ते ७ वी – (मोठा गट ) प्रथम – रेवण अनंत राऊळ
द्वितीय – कु.अनुष्का विनोद सुतार, तृतीय- कु.ऋतुजा गोरक्षनाथ गायकवाड, उतेजनार्थ – कु.तनुश्री लवेश सौंदळकर,कु. अनुश्री हरिहर सरवणकर
या सर्व शालेय विद्यार्थ्यांनी कथाकथन स्पर्धेत घवघवित यश संपादन केले असून नगर वाचनालय खारेपाटण च्या अध्यक्षा श्रीम.मंगला राणे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या कथाकथन स्पर्धेच्या परीक्षण करीता खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शिक्षिका श्रीम. अलका मोरे,श्रीम.आरती जेजोन तसेच खारेपाटण हायस्कूल च्या शिक्षिका श्रीम.वृषाली दर्पे,श्रीम. आदिती गुरव यांनी सहकार्य केले.तर संपूर्ण कथाकथन स्पर्धेच्या आयोजना करीता खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कथाकथन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना नगर वाचनालयाच्या वतीने रोख रकमेची पारितोषिके तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. दीं.१५ एप्रिल २०२४ रोजी बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थित घेण्यात. येणार असल्याची माहिती खारेपाटण नगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्री महेश सकपाळ यांनी दिली.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण