अनादी मी अनंत मी, सामाजिक मंच, कणकवली यांची महाड पाणी सत्याग्रह दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.
कणकवली/मयुर ठाकूर
20 मार्च 1927 रोजी बाबासाहेब आणि त्यांचे सवर्ण दलीत मुस्लिम सहकारी यांनी महाड येथे पाणी सत्याग्रह करून अस्पृश्याना नवीन जीवन बहाल केले. याची आठवण म्हणून आज “अनादी मी अनंत मी, सामाजिक मंच कणकवली” यांच्याकडून त्यांना कणकवली बुद्धविहार इथे आदरांजली वाहिली गेली.
यावेळी शुभांगी पवार, मनाली राणे, भुषण मेस्त्री, वेदांत पवार, शैलेश घाडी, डॉ सतीश पवार हे हजर होते.