भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांच्या निवडीबद्दल सत्कार

लोकसभा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी युवा मोर्चाने सज्ज व्हावे —- डाॅ.अमेय देसाई , वैद्यकीय आघाडी
सावंतवाडी
भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पदी प्रणव वायंगणकर यांची निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुका कार्यालयात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपा वैद्यकीय आघाडीचे संयोजक डाॅ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ.अमेय देसाई म्हणाले की , भारतीय जनता पार्टीचे आपण सर्व कार्यकर्ते नशीबवान आहोत . आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विश्वविख्यात लोकप्रिय नेता लाभला आहे . तसेच आपल्याला पक्षाचे मजबूत संघटन लाभले आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पक्षासाठी चांगल्या वाईट दोन्ही काळात तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची सोबत लाभली आहे . मोदीजींनी लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . महाविजय २०२४ अशी आपली घोषणा आहे , आपल्याला शक्य आहे . विजय दृष्टीपथात आहे, म्हणूनच युवकांनी सज्ज व्हावे . आता महत्वाची लढाई जिंकायची आहे . जनतेने मोदीजींना पुन्हा एकदा आशिर्वाद देण्याचे मत बनविले आहे . आपण जनतेचा आशिर्वाद मिळविण्यात कोठेही कमी पडायचे नाही. आपल्याला केंद्र सरकार व राज्य सरकार ने केलेली कामे जनतेला सांगायची आहेत व याची संपूर्ण जबाबदारी युवा मोर्चाची आहे . युवा मोर्चाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन तरुणांसमोरील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न तसेच तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यापासुन , त्यांच्या कौशल्यांना अनुरुप रोजगार संधी मिळवुन देण्यापर्यंत आणि नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यापर्यंत सर्व स्तरावर सरकारने उचललेली पावले ही युवा वर्गापर्यंत पोहचवीणे हे युवा मोर्चाचे काम असल्याचे सांगीतले .
यावेळी प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे , जेष्ठ कामगार नेते प्रकाश रेगे , जिल्हा उपाध्यक्ष अँड.सुषमा खानोलकर , महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , महीला मोर्चा जि.उपाध्यक्षा वृंदा गवंडळकर , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर , संदिप पाटील , हेमंत तुळसकर , बुथप्रमुख सुहास नवार , कामगार आघाडीचे प्रशांत नवार , ओबीसी सेल चे सुनिल मठकर , बाबली तुळसकर , रावजी राणे , रमेश झोटे , अशोक खराडे , राजन पडवळ , सचिन पेडणेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .