उभादांडा येथील श्री गणपतीचे म्हामणे कार्यक्रम २२ मार्च रोजी

वेंगुर्ले तालक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील प्रसिद्ध श्री गणपतीचे “म्हामणे” ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार २२ मार्च रोजी दुपारी १.३० ते ३.३० वा . या वेळेत संपन्न होणार आहे. शनिवार २३ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. श्री च्या मूर्तीचे ढोल ताशांच्या , भजनाच्या गजरात सागरेश्वर समुद्रकिनारी विसर्जन होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र व अन्य राज्यात प्रसिद्ध पावलेल्या उभादांडा गणपतीचे लक्ष्मीपूजन च्या मुहूर्तावर पूजन केले जाते व होळीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्यात येते, अशा अगाध लीलेने हे गणपती मंदिर प्रसिद्धीस पावले आहे. तर पुढील कालावधीत लक्ष्मीपूजन पर्यंत श्री गणपती फोटोचे पूजन केले जाते. भाविकांनी लाभ घ्यावा , असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.