नागवे मध्ये बिबट्याचे दर्शन

वाहनाच्या प्रकाशात बिबट्याने रस्त्यावर दिली रुबाबशीर पोझ
कणकवली तालुक्यात नागवे खालची पटेल वाडी या भागात रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. गाडीच्या लाईट मध्ये हा बिबट्या रस्त्यावर अगदी रुबाबात पोझ देत काही वेळ थांबला व त्यानंतर बिबट्या जंगलमय भागात पसार झाला. नागवे भागात बिबट्या चे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांमधून केली जात आहे.
दिगंबर वालावलकर, कणकवली