युवा संदेश प्रतिष्ठान आणि भाजपा नाटळ -सांगवे विभागाच्या वतीने महिला दिनाच्या औचित्याने महिलांसाठी हस्तकला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

दि.४ मार्च २०२४ ते १५ मार्च २०२४ या कालावधीत सांगवे ग्रामपंचायत सभागृह, कनेडी बाज़ारपेठ येथे दुपारी ३:०० ते ५:०० या वेळेत महिलांसाठी विविध हस्तकलांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीरातून महिलांसाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी महिलांना सक्षम बनविण्याचा प्रतिष्ठानचा उद्देश्य आहे. महिला दिनाच्या औचित्याने युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत आयोजित शिबिरामध्ये सौ प्रियाली सुरेंद्र कोदे, कणकवली, आणि त्यांचे सहकारी संस्कार भारती रांगोळी आणि फ्लावर मेकींग विषयी मार्गदर्शन करणार आहेत
तरी सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत माजी जि प अध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी केले आहे. शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्रीम मयुरी मुंज,9404450484 राजश्री पवार 8275363801 आणि श्रीम. मिलन पवार 9422373174 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण