केंद्राच्या योजनेतून वागदे ग्रामसचिवालय चे काम मंजूर

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न
5 मार्च रोजी आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार कामाचे भूमिपूजन
सरपंच संदीप सावंत यांची माहिती
केंद्र सरकारच्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत वागदे ग्रामसचिवालय इमारतीचे काम मंजूर करण्यात आले आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून या कामाला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र राज्यातील ७३ ग्रामपंचायतींनाच सदर अभियानात घेण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हयातून २ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला. त्यामध्ये कणकवलीतून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असून या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, विद्युत वितरण कार्यालय, पोस्ट ऑफीस, बचत गट ग्रामसंघ कार्यालय इत्यादी कार्यालये एकत्रितरित्या होणार आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सरपंच सदीप रमाकांत सावंत यांनी जि. प. च्या माध्यमातून ८ गुंठे जागेची परवानगी घऊन सुसज्ज अशी इमारत उभी राहणार असल्याची माहिती दिली. आमदार नितेश राणे साहेब यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी उच्च स्तर (वर्ग १) व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार 5 मार्च रोजी सकाळी११.०० वाजता भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली/ प्रतिनिधी