सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वरनगर यांच्या मार्फत ३ मार्च रोजी सिंधुदुर्ग मॅरेथॉन -२०२४ चे आयोजन

खारेपाटण येथील सखी महिला मंडळ रामेश्वर नगर खारेपाटण यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा अर्थात “वूमन रन फॉर हेल्थ” चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांसह लहान मुले युवक – युवती ,जेष्ठ नागरिक देखील सहभागी होऊ शकतात.असे सखी महिला मंडळाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
खारेपाटण येथे रविवार दी.३ मार्च २०२४ रोजी सकाळी होणाऱ्या या सिंधुदुर्ग मॅरेथॉन स्पर्धेत किड्स रन – (मिनी मॅरेथॉन)अंतर – २.५ किमी., वुमेन्स रन – (हाफ मॅरेथॉन) – अंतर – ५.० किमी., ओपन रन -(फूल मेरेथॉन )अंतर -१०.० किमी. असे विविध टप्पे ठेवण्यात आले असून रन स्टार्ट पुढील प्रमाणे ठेवण्यात आले आहे. १० किमी – सकाळी ६.१५ वा.
५ किमी.- सकाळी ६.२५ वा. तर
२.५ किमी.- सकाळी ६.३५ वा. तरी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी दी.२ मार्च २०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत सखी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ.प्रणाली कुबल – ९४०३७६२६६३,तृप्ती पाटील – ८७९३३१२२१५,अनुजा ठाकूरदेसाई – ८६९८००८५६३, यांचेकडे नोंदवावित.तसेच स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आयोजक डॉ. मालांडकर – ९३२५०७८१२२, प्राजल
कुबल – ९४२३८०६०८२,मंगेश गुरव – ९४२२४३३७६० यांच्याशी संपर्क साधावा.
सदर मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग खारेपाटण पोलीस चेकपोस्ट समोरील ब्रीज ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चींचवली कडे जानाऱ्या रस्त्यावर होणार असून या स्पर्धेकरिता कोणतेही प्रवेश शुल्क घेण्यात येणार नाही.तर प्रत्येक रन मधील पहिल्या अनुक्रमे तीन नंबरना मेडल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.सहभागी सर्वच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देखील मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे.तसेच मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पाणी व नाश्ता ची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. मॅरेथॉन मध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना शूज कंपलसरी असून हाफ पँट, ट्रक पँट, टी शर्ट,सलवार इत्यादी कपडे चालतील असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तरी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा.असे आवाहन रामेश्वर – जिजामाता नगर मित्र मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष श्री राजेंद्र वरुणकर व मंडळाचे कार्यवाह खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव यांनी केले आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण