वाचन आहे प्रवास सुंदर!

ठाकूर गुरुजींच्या शाळेत रमले आबाल वृद्ध

मराठी भाषा गौरवदिन, कुसुमाग्रज जयंती निमित्त श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ पळसंबचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : कुसुमाग्रज यांची जयंती, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून पळसंब गावातील जयंती देवी मंदिरात “वाचन आहे प्रवास सुंदर” हा मार्गदर्शन पर कार्यक्रम कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांच्या मार्गदर्शन पर व्याख्यानाने पार पडला.

ठाकूर गुरुजी यांनी आपल्या जीवन प्रवासात पुण्यातील रिक्षाचालकाचा अनुभव आणि त्याने लिहिलेले पुस्तकं, नाशिक कारागृहातील कैद्याना नाट्यप्रयोग शिकवताना आलेले अनुभव आणि त्यांच्यात झालेले बदल, चिरेखणी वरील कामगारांचा अनुभव, कुसुमाग्रजाचा घडलेला सहवास, तसेच आपला बौद्धिक खजाना उलगडला, यावेळी मंगेश पाडगावकरच्या “ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती” या कवणाने उपस्थित सारे आबाल वृद्ध तल्लीन झाले. जणू ठाकूर गुरुजीचा वर्ग चालू असल्याचा भास झाला. वाचन संस्कृती आपल्यात मुळा पासूनच आहे. असा सल्ला ही यावेळी ठाकूर गुरुजी यांनी दिला.

यावेळी देवस्थान मानकरी श्रीप्रकाश कापडी, देवस्थान मानकरी राजन पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष मधुकर कदम, मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर, सदस्य बबन पुजारे, खजिनदार वैभव परब, पुजा मुणगेकर, मेघशाम जुवेकर, रुपेश पुजारे दत्तगुरू परब, यशवंत पुजारे, अशोक जुवेकर विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी बहारदार शब्दात केले तर समारोप देवस्थान मानकरी प्रकाश कापडी यांनी केले.

error: Content is protected !!