“राष्ट्रीय विज्ञान दिनी” आयडियल इंग्लिश स्कूल ने केला राष्ट्रीय विक्रम.

कणकवली/मयुर ठाकूर.
“राष्ट्रीय विज्ञान दिन”ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला
ज्येष्ठ कलाशिक्षक श्री अनिल आचरेकर यांच्या शुभहस्ते या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रशालीतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांमधून विज्ञानाची महती सांगितली ,यानंतर या विज्ञान दिनाच्या औचीत्याने “एक विशेष उपक्रम ” नॅशनल रेकॉर्ड सी वी रमण यांची चित्रकृती ब्लॅंकेटच्या सहाय्याने प्रशालेतील 500 विद्यार्थ्यांनी साकार करत आयडियलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला .समाजाचे आपण ऋण लागतो हे ,ऋण व्यक्त करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने ही ब्लॅंकेट्स जिल्ह्यातील अनाथआश्रम ,वृद्धाश्रम ,गरजू व्यक्तींना विद्यार्थ्यांच्या हस्ते देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर श्री अनिल आचरेकर सर श्री.हनीफभाई पटेल (निवृत्त अधिकारी मुंबई महानगरपालिका) ,श्री.बाबासाहेब वरदेकर (माजी उपसभापती कणकवली) , ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत,सचिव प्राध्यापक.हरी भाऊ भिसे सर,कार्याध्यक्ष
श्री.बुलंद पटेल ,संस्था सदस्य श्री. यज्ञेश शिर्के सर,तसेच सल्लागार डी.पी तानावडे ,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन प्रशालेचे उपशिक्षक श्री.हेमंत पाटकर सर यांनी केले.