महायुतीच्या माध्यमातून सहा विभागीय मेळावे;तारखा लवकरच जाहीर करणार – सुनिल तटकरे

मुंबई – महायुतीच्या माध्यमातून सहा विभागीय मेळावे घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा सहा ठिकाणी मोठे मेळावे मार्च महिन्यात होणार आहेत. यासंदर्भाच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर लोकसभा निवडणुक जागा वाटपाबाबत एकत्रित राज्यपातळीवर बसून अंतिम शिक्कामोर्तब अमित शहा यांच्या स्तरावर होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.





