रामेश्वर वाचन मंदिर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत साक्षी राणे प्रथम

आचरा–अर्जुन बापर्डेकर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रामेश्वर सार्वजनिक वाचनमंदिरतर्फेआयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बापर्डेकर येथील साक्षी राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांक संग्राम सतीश कासले मालवण यांनी तर
तृतीय क्रमांक संजीव आत्माराम राऊत,जामसंडे देवगड यांनी मिळविला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेला
मराठी भाषा संवर्धनासाठी युवकांचे योगदान.हा विषय देण्यात आला होता.
या साठी जिल्हा भरातून प्रथम आलेल्या १० स्पर्धकांना सहभाग देण्यात आला होता.
. सदरची स्पर्धा संस्थेचे कार्यवाह.अर्जुन बापर्डेकर कार्यकारीणी सदस्य जयप्रकाश परुळेकर,तसेच श्रीम. भावना मुणगेकर, मुंबई, श्री. प्रसाद रेडकर, मुंबई, श्रीम. मिथिला नेरुरकर, पुणे, कै. सुधाकर (दाजी) आचरेकर, आचरा या दात्यांनी प्रायोजित केली होती. सदर स्पर्धेत उत्तेजनार्थ
.दत्तसाई नंदकुमार कदम,आचरा
कु.कशिष दत्तप्रसाद खडपकर,कुडाळ यांना गौरविण्यात आले.
प्रथम ३ क्रमांकाना साहित्यिक श्री.सुरेश ठाकूर यांजकडून पुस्तकरूपी भेट देण्यात आली.स्पर्धेचे बक्षीस संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, उपाध्यक्ष अशोक कांबळी, साहित्यिक सुरेश ठाकूर, जयप्रकाश परुळेकर, श्रीमती वैशाली सांबारि,भिकाजी कदम,केंद्रप्रमुख सुगंधा गुरव,परीक्षक सौ मधुरा माणगांवकर,एकनाथ गायकवाड, पारिपत्ये सर,ग्रंथपाल विनिता कांबळी,सांस्कृतिक समितिच्या भावना मुणगेकर, वर्षा सांबारि,कामिनी ढेकणे यांसह अन्य मान्यवर आदि उपस्थित होते.
. सदर स्पर्धेचे परीक्षण . एकनाथ गायकवाड,शिक्षक त्रिंबक हायस्कूल व सौ.मधुरा माणगावकर, शिक्षिका आचरा हायस्कूल यांनी केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती सदस्या सौ.वर्षा सांबारी यांनी केले तर आभार संस्थेचे कार्यवाह श्री.अर्जुन बापर्डेकर यांनी मानले.





