श्री स्वामी उपासना केंद्र कणकवलीच्या वतीने १२ वा वर्धापनदिन साजरा

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन
श्री स्वामी उपासना केंद्र कणकवलीच्या वतीने १२ वा वर्धापनदिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सद्गुरू माउली श्री श्री १०८ महंत गावडेकाका महाराज यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बाळा रेडकर वेंगुर्ला केंद्र, पंकज कामत माड्याचीवाडी केंद्र, कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, एकनाथ वायंगणकर, विश्राम रासम आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत केंद्रप्रमुख विजय उर्फ दादा पावसकर यांनी केले.
याप्रसंगी सद्गुरुंनी चांगले कर्म करा, दुसऱ्याची निंदा करू नका, माणसाला पुढील प्रवासात त्याने कमावलेले धन उपयोगी पडणार नाही. त्याने कमावलेली पद, प्रतिष्ठा हि उपयोगाची नसते परंतु चांगली कर्मेच त्याचा मार्ग सुखकारक करत असतात. असा संदेश गावडेकाका महाराज यांनी दिला.
यावेळी केंद्राच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमामध्ये गटस्तरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला म्हणून कलमठ ग्रामपंचायतीच्या सफाई व पाणी कर्मचारी बांधवांचा सद्गुरू श्री श्री १०८ महंत महाधीश गावडेकाका महाराज यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गौरव मुंज, निलेश वाळके, हर्षद पटेल, रुपेश जाधव, प्रथमेश परब, सौ. अंजली पावसकर, सौ.मोरजकर, कणकवली उपासना केंद्राचे सर्व सेवेकरी, भक्तगण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ताम्हाणेकर व प्रास्ताविक विजय पावसकर यांनी केले. तसेच सायंकाळी दिपोत्सव कार्यक्रम युवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कणकवली प्रतिनिधी





