“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेमध्ये ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स वरवडे या प्रशालेला ‘संपूर्ण कणकवली तालुक्यातुन द्वितीय क्रमांक प्राप्त.

उपक्रमशील प्रशाला अशी ओळख असलेल्या आयडियल प्रशालेच होतंय सर्व स्तरातून कौतुक.

कणकवली/मयुर ठाकूर.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कायम १००% निकालाबरोबरचं शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ज्युनि. न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षा, ऑलंपियाड परीक्षा, BDS परीक्षा, गणित संबोध परीक्षा, इतर स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, निबंध, कथाकथन स्पर्धा,विविध क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्हा,विभाग स्तरापर्यंत या प्रशालेमधील मुले कायमच आघाडीवर दिसतात. क्रीडा स्पर्धांमध्ये तर मल्लखांब,रोप मल्लखांब,योगा, आर्चरी,वेट लिफ्टींग अशा अनेक प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ही शाळेची संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख आहे.
आयडियल इंग्लिश स्कूलचे गिनीज बुक रेकॉर्ड अब्दुल कलाम प्रतिकृती ,वन डे मार्केट ॲक्टिव्हिटी ,मार्गदर्शनपर व्याख्याने,मार्शल आर्ट अक्टिविटी,व्यावहारिक कौशल्य विकसित करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी आयोजन असे नावीन्यपूर्ण उपक्रमांनी तालुक्यात उल्लेखनीय शैक्षणिक काम केले आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये तालुक्यातून यां प्रशालेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून तब्बल दोन लाखाचे बक्षीस प्रशालेले पटकावले आहॆ.

या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ .विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर, खजिनदार सौ शितल सावंत मॅडम, सल्लागार श्री डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांमधून अभिनंदन केले जात आहे.

error: Content is protected !!