“शासकीय ग्रेड परीक्षेत आयडियल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश”
कणकवली/मयुर ठाकूर.
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे,इंटरमिजिएट परीक्षेत परीक्षेचा प्रशालेचा निकाल 91 टक्के लागला असून प्रशालेतून अजित कोळी व श्रावणी सामंत प्रथम श्रेणीमधून उत्तीर्ण झाले आहेत ,तर इलेमेंटरी परीक्षेचा प्रशालेचा निकाल 94% लागला असून अनुष्का दळवी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाली आहे
या यशाबद्दल संस्था अध्यक्ष डॉ .विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर, खजिनदार सौ शितल सावंत मॅडम, सल्लागार श्री डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांमधून अभिनंदन केले जात आहे.