हस्तकला कारागीर, कामगार कल्याण संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मारुती मेस्त्री

संस्थापक अध्यक्ष दीपक यादव यांनी दिले नियुक्तीपत्र
हस्तकला कारागिर कामगार कल्याण संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदी कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील मारुती मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती ही नियुक्तीच्या तारखेपासून पाच वर्षासाठी वैध असणार आहे. लेदरकाम, मातीपासून विविध मुर्ती तयार करणे, बांबुपासून वस्तू तयार करणे, वस्त्र छपाई, मेटल कास्टींग, दगडापासून मुर्ती किंवा भांडी बनविणे, चिनी मातीपासून मुर्ती किंवा भांडी बनविणे, संगित वाद्य, काच व सोने चांदी लाखपासून बनविलेले हर एक प्रकारचे माणीक काम, जरी एवं काशीदकारी, चित्रकार, हस्तशिल्प, कालीन या हस्तकला कारागीरांना शासनाच्या विविध योजने बाबतची माहिती करुन देऊन शासन पातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी हस्तकला कारागीर कामगार यांना एकत्र करुन युनिटी वाढवावी. तसेच हस्तकला कारागिर यांना शासनपातळीवर न्याय मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष दिपक यादव यांच्या नेतृत्वाखाली हस्तकला कारागिर कामगार कल्याण संघ शासन पातळीवर प्रयत्न करत आहे तरी आपण सुध्दा हस्तकला कारागिरांना न्याय देण्यासाठी सहकार्य करावे असे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. हस्तकला कारागीर कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक यादव यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली





