शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे एन.एम.एम.एस.परीक्षेत उज्वल यश

कुडाळ – शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावचे एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादीत केले व या परीक्षेतील यशाची परंपरा कायम राखली या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण ९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये कुमारी शांती विश्वनाथ गोडे,कुमारी सायली सचिन डिचोलकर,कुमार तुकाराम दत्ताराम हळदणकर, कुमार तुषार विष्णू पटवर्धन या विद्यार्थ्यांनचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे एन.एम.एम.एस.परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लावण्यासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या मार्गदशक शिक्षिका सौ.अर्चना चव्हाण मॅडम यांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक वर्ग यांचे शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावच्या वतीने संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभुतेंडोलकर व सचिव श्री मुकुंद धुरी तसेच शिक्षक पालक संघाच्या वतीने उपाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!