प्रिमिक्स (रेडी टू कुक) उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रमाचे संकल्प प्रतिष्ठान द्वारा ठाणे येथे आयोजन

संकल्प प्रतिष्ठान द्वारा ठाणे, वर्तकनगर येथे प्रिमिक्स (रेडी टू कुक) उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण दिनांक २४ ते २५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत संपन्न होणार आहे.
राज्यस्तरीय नोंदणीकृत, शासन पुरस्कारप्राप्त, प्रशिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या संकल्प प्रतिष्ठान द्वारा या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले आहे.
प्रिमिक्स ( रेडी टू कुक) उत्पादने म्हणजे कोरड्या अनेक घटकांचे व्यावसायिकरित्या तयार केलेले एखाद्या पदार्थाचे/उत्पादनाचे पूर्वमिश्रण होय. सध्याच्या घाईगडबडीच्या युगामध्ये लोक तयार खाद्यपदार्थांकडे वळत असल्याचे दिसते. या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे पूर्वमिश्रण (प्रिमिक्स) या तंत्रज्ञानाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. प्रिमिक्स किंवा रेडी टू ईट (खाण्यासाठी तयार खाद्यपदार्थ) तयार करणे अत्यंत सोपे असून, या तंत्रज्ञानाद्वारे विविध खाद्यपदार्थ तयार करता येतात.
एखादा पदार्थ तयार करायचा झाल्यास अनेक घटक पदार्थांची जुळवा-जुळव करावी लागते. त्याला वेळही लागतो. त्याऐवजी सर्व घटक पदार्थांचे पूर्वमिश्रण तयार मिळाल्यास ते सुद्धा विशिष्ट फॉर्म्युल्यासह तर निश्चितच ग्राहकांना आवडते. त्यामुळे अशा प्रिमिक्स उत्पादनांना मोठी मागणी आहे.
मुंबई, ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये “बिझी लाईफ शेड्युल” मुळे अशा इंस्टंट (रेडी टू कुक) प्रिमिक्स उत्पादनांना मोठी मागणी असून प्रिमिक्स उत्पादनांना लागणारा कच्चा माल होलसेल दरात सहज उपलब्ध होतो. तसेच उत्पादनासाठी आवश्यक इतर बाबी जसे आकर्षक पॅकिंग साहित्य, मशिनरी, मनुष्यबळ इ.) सहज उपलब्ध होते. असा हा कमी जागेत व कमी गुंतवणूकीत होणारा उद्योग असून केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानित कर्ज योजनाही या उद्योगासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रिमिक्स उत्पादने निर्मिती ही उद्योग संधी असून जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार, महिलांनी याचा लाभ घ्यावा. गृहिणी अथवा नोकरी करणारे सुद्धा फावल्या वेळात हा उद्योग सुरू करू शकतात. प्रिमिक्स उत्पादनांना प्रदेशात सुद्धा मोठी मागणी असते.
सुरूवातीला लहान प्रमाणात केल्यास कमी गुंतवणूक मध्ये व कमी जागेतही हा उद्योग करता येतो. प्रिमिक्स उत्पादने निर्मिती ही खुप सोपी प्रक्रिया असते, मात्र याचं परिपूर्ण व प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.
ठाणे येथे होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत इडली मिक्स, डोसा मिक्स, उत्तप्पा मिक्स, उडीद वडा, दही वडा, ढोकळा, आप्पे मिक्स, थालीपीठ डाळींचे, थालीपीठ कडधान्यांचे, शिरा, गुलाबजामुन, खीर, बासुंदी, उपमा, पोहे, मिसळ, उपवास भाजणी, पालक पुरी, आंबोळी पीठ, जिलेबी मिक्स, केक मिक्स, ग्रेव्ही मिक्स, सूपचे प्रकार, बिर्याणी, पावभाजी इ. Premix/Ready to Cook
उत्पादनांचे प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
ठाणे, मुंबई, नवीमुंबई, रायगड व पालघर या जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे संकल्प प्रतिष्ठान द्वारा आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी व प्रवेश घेण्यासाठी PMP01 हा कोड 9145428338 या नंबरवर व्हाट्सअप करावा.





