परशुराम उपरकर यांचा मनसेशी काहीही संबंध नाही

मनसे नेते शिरीष सावंत यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती

उपरकर म्हणतात मी प्राथमिक सदस्यत्वासह पदाचा राजीनामा दिला

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष आंदोलने व अन्य बाबींवर माहितीच्या अधिकारातून आवाज उठवणारे परशुराम उपरकर यांचा मनसेशी काहीही संबंध नाही असे प्रसिद्धी पत्रक मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिले आहे. हे पत्र म्हणजे परशुराम उपरकर यांची हकाल पट्टी असल्याचे संकेत मानले जात आहेत. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर यांचा यापुढे मनसेशी कुठलाही सबंध असणार नाही. या अप्रत्यक्षपणे उपरकर यांची हकालपट्टीच केल्याचे जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहीत मनसे च्या पदाचा आणि पक्ष प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!