माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त चोरेश्वर गणपती मंदिर येथे विविध कार्यक्रम

माघी गणेश जयंती उत्सव गणेश मित्रमंडळ पिळणकरवाडी तर्फे श्री गणेश मंदिर येथे मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 13 रोजी सकाळी ९.३० वाजता गणेश जयंती सोहळ्याचा प्रारंभ दुपारी महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती स्थानिक भजने रात्रौ नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गणेश मित्रमंडळ पिळणकरवाडी यांनी केले आहे.