माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त हिर्लेवाडी येथे विविध कार्यक्रम

माघी गणेश जयंती उत्सव मंडळ आचरा हिर्लेवाडी तर्फे श्री पंढरीनाथ मंदिर येथे मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी ते शनिवार १७फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 13 रोजी सकाळी ९.३० वाजता गणेश जयंती सोहळ्याचा प्रारंभ दुपारी महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती स्थानिक भजने रात्रौ नऊ वाजता मंदार मुणगेकर यांचे ढोलकी वादन .साडेनऊ वाजता गीत मल्हार कराओके आणि लाईव्ह आर्केस्ट्रा हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.बुधवार १४ फेब्रुवारी रोजी दैनंदिन कार्यक्रमासोबत रात्रौ नऊ वाजता जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सत्यनारायणमहापूजा , दुपारी महाप्रसाद सायंकाळी सात वाजता आरती रात्रौ नऊ वाजता पारंपारिक डबलबारीचा जंगी सामना सुप्रसिद्ध बुवा श्री श्रीधर मुणगेकर विरुद्ध बुवा श्री रामदास कासले यांच्यात रंगणार आहे तर शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसाद ,दुपारी तीन वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रात्रौ आठ वाजता स्थानिक भजने साडेनऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य वाटप व मान्यवरांचा सत्कार समारंभ प्रमुख उपस्थिती सिनेस्टार अबोली मालिका प्रेम मौसमी तोंडवळकर यांची लाभणार आहे.तर रात्री साडेदहा वाजता वावळेश्वर दशावता नाट्य मंडळ तेंडोली यांचा दशावतारी नाटक प्रयोग अघोर लक्ष्मी सादर होणार आहे. शनिवार १७ फेब्रुवारी दुपारी महाप्रसाद सायंकाळी साडेचार वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन माघी गणेश जयंती उत्सव मंडळ हिर्ले वाडी यांनी केले आहे.

आचरा–अर्जुन बापर्डेकर

error: Content is protected !!