श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलचे गांधी विचारधारा परीक्षेत यश

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी दर्शना दत्ताराम इंदुलकर (इयत्ता- आठवी) या विद्यार्थिनीने ‘गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव ‘ आयोजित गांधी विचारधारा परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावत सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र प्राप्त केले. या परीक्षेत प्रशालेमधून एकूण 55 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
महात्मा गांधींचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत. आणि विद्यार्थी संस्कारक्षम व्हावेत. हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी या परीक्षेचे आयोजन प्रशालेमध्ये केले जाते.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेडल प्राप्त विद्यार्थिनीला मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
या परीक्षेसाठी प्रशालेतील मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल आणि शिक्षिका प्रतिभा केळुसकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

संतोष हिवाळेकर पोईप

error: Content is protected !!