कणकवली मतदारसंघातून अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तां करिता आमदार राणें कडून मोफत सेवा

8 फेब्रुवारी रोजी नांदगाव ते पनवेल पर्यंत सोडणार लक्झरी

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातुन २३८ रामभक्त अयोध्येला जाणार आहेत. भाजपा प्रदेश कार्यालयाकडून अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. या गाडीतून रामभक्तांना अयोध्या वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातुन अयोध्येसाठी जाणाऱ्या राम भक्तांसाठी मोफत सेवा दिली आहे. दि. ८-२-२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता नांदगाव ते पनवेल लक्झरी गाडी सोडली आहे. तसेच प्रवासामध्ये अत्यावश्यक लागणारी औषध, थंडी वाऱ्याचे साहित्य आपल्या सोबत घ्यावयाचे आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!