आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये टेबल टेनिस खेळाचा शुभारंभ.

कणकवली/मयुर ठाकूर.

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वरवडे हि प्रशाला विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शालेय शिक्षणासोबतच विविध क्षेत्रात कायमच प्रयत्नशील असते. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ, स्केटिंग,मार्शल आर्ट यामध्ये धनुर्विद्या, तलावरबाजी, लाठीकाठी, रिव्हर क्रॉसिंग, झिप लाईन, रोप मल्लखांब, मल्लखांब, रायफल शूटिंग असे विविध खेळ तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनातून शिकवले जातात. या सर्व खेळांमध्ये मुलांनी देखील आजवर चमकदार कामगिरी केली आहॆ.
यां सर्व खेळांसोबत टेबल टेनिस हा खेळ सुद्धा मुलांसाठी प्रशालेमध्ये सुरु करण्यात आला आहॆ. जगभरात मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणाऱ्या यां खेळाचे आपल्या मुलांनींही कौशल्य आत्मसात करण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणातून सुरु करण्यात आला आहॆ. या खेळाचा शुभारंभ राष्ट्रीय खेळाडू तसेच प्रशिक्षक आणि पंच चंद्रकांत माईणकर यांच्या प्रमुख उपस्थितीतीत करण्यात आला. सोबत टेबल टेनिस पटू नितीन तळेकर उपस्थित होते. संस्थेचे सल्लागार डि.पी तानवडे सर आणि मुख्याध्यापिका अर्चना देसाई यांच्या हस्थे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर माईणकर यांनी मुलांना टेबल टेनिस चे महत्व समजावून सांगितले. मुलांसोबत यां खेळ खेळत माईणकर यांनी मुलांचा उत्साह देखील वाढवला.यां उपक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोशाध्यक्ष, सल्लागार, मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!