आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे स्कूलमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात.
कणकवली/मयुर ठाकूर
मराठी ही आपली राजभाषा आहे,आणि या भाषेचा अधिक प्रचार आणि प्रसार व संवर्धन होणे या उद्देशाने शासनातर्फे प्रतिवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी सर्वत्र साजरा होतो .
नुकतेच या पंधरवड्याच्या निमित्ताने ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे विविध उपक्रम घेण्यात आले.यामध्ये 6 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य संकलन करण्याचा उपक्रम ,इयत्ता 7 वी साठी शुध्दलेखन स्पर्धा.
या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
१) आयुष अवधूत बागवे ( 7 A)
२) स्नेहल दीपक खरात (7A)
३) सृष्टी सुदर्शन पालव ( 7 B)
त्याच प्रमाणे इयत्ता 8 वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेतील विजेते
१) खुशी विशाल आमडोसकर,(8 A)
२) मोहन संभाजी नांदगावकर ( 8 A)
३) गायत्री राजेंद्र शिंदे ( 8 B)
या स्पर्धांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला
संस्था अध्यक्ष डॉ .विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत ,कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे ,सहसचिव प्राध्यापक निलेश महेंद्रकर, खजिनदार सौ शितल सावंत मॅडम, सल्लागार श्री डी.पी तानावडे सर, मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या .