सिंधुगर्जना ढोलताशा पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा
२६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन परेड मध्ये महाराष्ट्र ढोल ताशाचे केले नेतृत्व, श्री जगन्नाथ मंदिर पुरी ओडिशा येथे वादनासाठी ८ दिवसीय दौऱ्यावर सिंधुगर्जना पथक.
कणकवली/मयुर ठाकूर
एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथकाला नुकत्याच झालेल्या कर्तव्य पथ दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनातील विशेष परेडमध्ये पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी, राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मु आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमैनुएल मैक्रों आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सहभागी होण्याची संधी मिळाली भारतातील विविध राज्यातील महिला वादकांच्या वाद्य वादनाने परेड ची सुरुवात झाली, यामध्ये महाराष्ट्र ढोल ताशाचे नेतृत्व सिंधुगर्जना ढोलताशा पथकाने केले महिला वादकांच्या वादनाने संचलन होण्याचा गेल्या ७५ वर्षातील हा पहिलाच ऐतिहासिक प्रसंग होता, रोमांचक असा हा सोहळा होता. यासाठी निवड झालेल्या मुलींनी दिनांक ५ जानेवारी ते २५ जानेवारी दिल्ली येथे सराव केला, त्यानंतर दिनांक २७ जानेवारी ला सिंधुगर्जना पथकाला ओडिशा पूरी येथील श्री जगन्नाथ मंदिर येथे वादनाचे निमंत्रण आले व त्यासाठी सध्या सिंधुगर्जना पथक दिनांक ३ फेब्रुवारी पर्यंत पूरी ओडिशा येथे आहे. यासाठी श्री.देवेंद्र शेलार, श्री.मिलिंद परब यांचे मार्गदर्शन लाभले.
सिंधुगर्जना पथक नेहमीच ढोलताशा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असते, यापूर्वी सिंधुगर्जना पथकाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कलेचा ठसा ४ पेक्षा अधिक राज्यात उमटवला आहे व १६० पेक्षा अधिक वादने करत एकाच वेळी १००० पेक्षा अधिक वाद्य वादनाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे, पथकाच्या ह्या कामगिरीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे,
या कामगिरीबद्दल सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.