संविधान दिनाच्या पंचाहत्तरी निमित्तनेसिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन

बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु, १३० बौद्ध देशांची जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या World Fellowship of Buddhist या जागतिक संघटनेचे सचिव व बोधीसत्व* डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या The Buddhist Society of India तीच भारतीय बौद्ध महासभा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा संघटनेचे व सर्व तालुका संघटनेचे माध्यमातून भारतीय संविधान दिनास ७५ वर्षे पुर्ण होत असल्याने संविधान अमृतमहोत्सवी वर्ष सन २०२४ निमित्ताने *रविवार दिनांक १० माहे मार्च २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही धम्मपरिषद रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला असलेले ठिकाण म्हणजे मालवण शहर, या ऐतिहासिक शहरात *रविवार दिनांक १० माहे मार्च २०२४ या दिवशी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत दोन सत्रामध्ये धम्म संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार आहे.
प्रमुख वक्तेम्हणून – डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, सचिव WFB तथा राष्ट्रीय अध्यक्ष ट्रस्टी चेअरमन दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा. यांचे मार्गदर्शन लाभणार आहे
या कार्यक्रमास केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी व महाराष्ट्रातील सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
*धम्ममेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे. आवां हन
आयु. विद्याधर धोंडू कदम, जिल्हाध्यक्ष ,
आयु. आनंद विश्राम धामापुरकर, जिल्हा महासचिव, यांनी केले आहे.
मालवण(प्रतिनिधी)