शेठ न.म.विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण मध्ये एस.बी.आय.मार्फत गुंतवणूक कार्यशाळा संपन्न

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटण यांच्या वतीने गुंतवणूक कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती स्टेट बँक ऑफ इंडिया, खारेपाटण शाखेच्या मॅनेजर योगिता ढाणे मॅडम, एसबीआय लाइफचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सीनियर एरिया हेड केदार खानविलकर हे प्रमुख मार्गदर्शक होते. तसेच एसबीआय लाइफच्या बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर शितल गव्हाणकर मॅडम याही उपस्थित होत्या.
सुरुवातीला प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपल्या प्रास्ताविकामध्ये गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आत्माराम कांबळे, प्रशालेचे पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षक सचिन शेट्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!