सावंतवाडी विभागीय कवियत्री संमेलन

स्त्रीच्या विचारांना व्यासपीठमिळणे गरजेचे – कवियत्री अनुजा जोशी

सावंतवाडी – स्त्रीच्या आत्मसन्मानाचा बोलबाला झाला आहे ,अशा स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात सावंतवाडी विभागीय कवियत्री संमेलन घेतले जात आहे हे खऱ्या अर्थाने स्त्रीच्या अस्मितेचा प्रतीक आहे .स्त्रीच्या विचारांना हे वेगळं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम संपूर्ण साहित्य क्षेत्राच्या विश्वातील हे निमंत्र्यांचे कवियत्री संमेलन खरोखरच आगळे वेगळे असे आहे .

संपूर्ण महाराष्ट्रभराच्या विभागातून कवियत्री या कवयित्री संमेलनाचे प्रतीत्व करत आहेत ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे या निमंत्रित कवियत्री संमेलनाची तपश्चर्या आहे .
अशा शब्दात उद्घाटक म्हणून बोलताना गोवा येथील कवियत्री अनुजा जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर च्या सभागृहात घेण्यात आलेल्या आरती मासिक कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सतरावे निमंत्रित कवियत्री संमेलन आज रविवारी शानदार पद्धतीने उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावरया कवयित्री संमेलनाचे अध्यक्ष पुणे येथील जेष्ठ कवियत्री लेखिका अंजली कुलकर्णी मृणालिनी कानेटकर, जयश्री बर्वे, उज्वला लुकतुके ,आशावरी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना कवियत्री जोशी म्हणाल्या स्त्रीच्या वाट्याला आत्मसन्मानाचा बोलबाला झालेला पाहायला मिळतो. पण अशा या बोलबल्याच्या काळात स्त्रीच्या या चळवळीला हे संमेलन म्हणजे एक प्रतीक आहे .संपूर्ण महाराष्ट्रभरातून विभाग स्तरातून या कवयित्री संमेलनाचे प्रतिनिधित्व केलं जात आहे अख्या साहित्य विश्वात असे कवियत्री संमेलन सावंतवाडी तीन संस्थांच्या माध्यमातून भरत आहे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि या कवयित्री संमेलनाची तपश्चर्या साहित्यिका लेखिका उषा परब करत आहे. हे खरोखरच वापरण्याजोगे आहे असे कवियत्री संमेलन भरवले जात आहे .आणि त्या अशा कवयित्री संमेलनाला सर्वांनी आर्थिक मदतीचे हत्तीचे बळ द्यावे असे आवाहन तिने केले .यावेळी आरती मासिक तर्फे घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेच्या बक्षीस वितरण मध्ये प्रथम क्रमांक मानसी पाटील, द्वितीय क्रमांक मृण्मयी बांदेकर, तृतीय क्रमांक मधुरा माणगावकर ,उत्तेजनार्थ हेमा सावंत राधा गाड ,यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले .यावेळी घे भरारी फाउंडेशनच्या मोहिनी मडगावकर त्यांच्या टीमचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कवियत्री सिंधुदुर्ग ,रत्नागिरी, गोवा, या सर्वांचे न देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी श्रीराम वाचन मंदिर चे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कोमसापचे तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत ,आरती मासिकचे सहसंपादक भरत गावडे, यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखिका कवियत्री उषा परब यांनी केले .त्या म्हणाल्या गेली सतरा वर्ष निमंत्रित विभागीय कवियत्री संमेलन भरत आहे आणि यासाठी तीन संस्था एकत्र येऊन हे कवी संमेलन आम्ही भरवत आहोत ,यासाठी आम्हा स्त्रियांना व्यासपीठ मिळवून दिले गेले आहे आणि यासाठी आमच्या सर्व महिला भगिनी त्यासाठी आपल्याला सहकार्य करत आहेत असेही त्या म्हणाल्या .
यावेळी श्रीराम वाचन मंदिर चे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कोमसापाचे तालुका अध्यक्ष संतोष सावंत, भरत गावडे ,सचिव प्रतिभा चव्हाण ,कवी दादा मडकईकर, मंगल नाईक ,प्रज्ञा मातोंडकर र,मेश बोंद्रे ,जी ए बुवा ,प्रभाकर भागवत, दीपक पटेकर ,मनोहर परब ,श्वेतल परब, स्मिता परब ,आदी उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक व अध्यक्षांचा परिचय प्रतिभा चव्हाण, स्मिता परब, कल्पना बांदेकर यांनी केला तर सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने कवियत्री उपस्थित होत्या .

error: Content is protected !!