कोकणातील काजू बी ला हमीभावासाठी मंत्रालयात 3 फेब्रुवारी रोजी बैठक
माजी आमदार प्रमोद जठार यांचा कोकणातील काजू बागायतदारांसाठी पुढाकार
कोकणातील काजू बी हमीभावाचा प्रश्न सुटणार
सिंधुदुर्ग जिल्हा सह कोकणातील काजू बी ला 200 रुपये हमीभाव द्या या मागणी करिता माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार व सिंधुदुर्ग पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन लक्ष वेधले. त्यावर रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भातील बैठक आयोजित करा अशी शिफारस अर्थमंत्री अजित दादा पवार यांना केल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. याबाबत रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शिफारस केल्याची बाब अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणताच तसा प्रस्ताव मंत्री मंडळ मीटिंग मध्ये आणावा. मी पैसे द्यायला तयार आहे. या विषयवर ३ फेब्रुवारी ला मंत्रालयात बैठक बोलावून हा विषय मार्गी लावुया असे आश्वासन अजित दादा पवार व रवींद्र चव्हाण यांनी दिल्याची माहिती श्री जठार यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली