कोंडये येथील तरुणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले स्वागत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पक्षाच्या विस्तारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील तरूण युवकांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. तसेच इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी विधानसभा प्रमुख संदेश पटेल ,उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील ,शेखर राणे, तालुका समन्वय सुनील पारकर आणि भास्कर राणे आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी