सिंधुदुर्गातील काजू बी ला हमीभाव मिळावा याकरता तहसीलदार कार्यालयासमोर धरणे

शेती विषयक विविध संघटनांचे होणार जिल्ह्यात आंदोलन

आयात काजू मुळे बाजार भाव कोसळल्या मुळे काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून दराची ३-४ वर्षात ३०० रुपये पासून ८०/९० रुपये पर्यंत घसरण झाली आहे. अनेकांचे बजेट कोलमडत आहे. आंदोलने करणे, दबाव वाढवणे या मार्गाने दर टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक २०० रुपये हमी भाव करणे आवश्यक झाले आहे. या मागणी साठी सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर जिल्ह्यात तहसील कार्यालयावर धरणे कार्यक्रमात सहभागी व्हा असे आवाहन श्रमिक शेतकरी संघटना कार्याध्यक्ष शांताराम पाटील सल्लागार अतुल दिघे सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादक संघटनेचे विजय सावंत यांनी केले आहे.
गोवा सरकारने काजू बिया ना रुपये १५० हमीभाव जाहीर केला आहे. दापोली विद्यापीठाने काजू उत्पादनाचा खर्च १२९ रुपये प्रती किलो आहे असे अभ्यासानंतर सांगितले आहे. अशा स्थितीत स्वामिनाथा अहवालाप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव १९३ रुपये आहे. सतत वाढत चाललेली महागाई लक्षात घेता शेतकर्याना २०० रुपये भाव मिळावा ही अत्यंत रास्त भूमिका आहे.
महाराष्ट्र सरकारने जागोजागी काजू खरेदी केंद्रे उभारून काजू खरेदी केला पाहिजे. कोल्हापूर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यात काजू झाडे आहेत. महाराष्ट्रात या पट्ट्यात पिकणारा काजू गुणवत्तापूर्ण व चवीला चांगला आहे. त्याला चोखंदळ गिरहाइकाची पसंती आहे. परंतु आयात शुल्क शासनाने घटवल्यामुळे आयात काजूचा पूर असून यामध्ये कडील शेतकरी हवालदिल होत आहे. काजू पिकच नष्ट होईल अशी परिस्थिती तयार झाली आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!