शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणचे संस्थापक गुरुवर्य स्वातंत्र्यसैनिक वीर शंकरराव पेंढारकर यांची शतक महोत्सवी जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व व्यवसाय अभ्यासक्रम खारेपाटण या प्रशालेचे संस्थापक गुरुवर्य स्वातंत्र्यसैनिक वीर शंकरराव पेंढारकर सर यांची शतक महोत्सवी जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न करण्यात आली.
गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांची जयंती 20 जानेवारी रोजी होती. त्यानिमित्त गुरुवार दिनांक 18 जानेवारी पासून सलग तीन दिवस ही जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.
गुरुवारी 18 जानेवारी रोजी प्रशालेमध्ये स्पंदन हा संगीत विषयावरील कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये तालवाद्य सुरवाद्य व गायन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशालेच्या संगीत विभागामार्फत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर येथील बाल शिवव्याख्याती कोल्हापूर येथील साईशा पाटील हिचे अतिशय रोमांचकारी व्याख्यान शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ साहेब यांच्या वरती आधारित असलेले आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जवळजवळ प्रशालेचे दीड हजार विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच खारेपाटण मधील नागरिक तसेच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, खजिनदार संदेश धुमाळे, सहसचिव राजेंद्र वरूणकर तसेच सर्व संचालक मंडळ आणि प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर पेंढारकर सरांच्या वरील आधारित गीत गायन कार्यक्रम प्रशालेच्या संगीत विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता त्यानंतर सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.
दुपारी अडीच वाजल्यापासून सायंकाळपर्यंत कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित कोण होईल गुरुवर्य प्रेमी महाविजेता ही स्पर्धा घेण्यात आली.
गुरुवर्य स्वतंत्र सैनिक वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी सर्वप्रथम पेंढारकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या धर्तीवर कोण होणार गुरुवर्य प्रेमी महाविजेता या कार्यक्रमातील दुसरे सत्र सुरू करण्यात आले. यामध्ये बारावी अ या वर्गातील प्रियदा गुरव तसेच अकरावी अ या वर्गातील वेदिका साईल या दोन विद्यार्थिनींनी कोण होणार गुरुवर्य प्रेमी महाविजेता या स्पर्धेतील महाविजेता होण्याचे भाग्य मिळवले. याच दरम्यान या कार्यक्रमाला माजी रणजीपटू प्रकाश पालांडे हे उपस्थित झाले होते. त्यांनी रत्नागिरी येथे क्रिकेट अकॅडमी सुरू केलेली आहे. त्यांनी खारेपाटणमधील तीन विद्यार्थ्यांना आजीवन प्रशिक्षण शिष्यवृत्ती जाहीर केली
कोण होणार गुरुवर्य प्रेमी महाविजेता या स्पर्धेमध्ये प्रत्येक वर्गातून एक स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या माध्यमातून हॉटसीटवर येऊन ही स्पर्धा खेळला. असे जवळजवळ 17 वर्ग या स्पर्धेमध्ये खेळले.
सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला अतिशय छान प्रतिसाद दिला व ही स्पर्धा यशस्वी झाली.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!