श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणे निमित्त चिंचवली येथे विविध कार्यक्रम संपन्न

चिंचवली येथे राम मंदिर उद्घाटनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
आज अयोध्या येथील राम मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री निनुदेवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंदिरात अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी पुरोहितांच्या हस्ते विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गावातील लोकांनी खणा नारळाने देवीची ओटी भरली. यानंतर ग्रामस्थांची सुस्वर भजने झाली. भजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवली गावातील सर्व ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.. या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे चिंचवली गावातील वातावरण राममय झाले होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!