शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले!

जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे प्रतिपादन
कणकवली पटवर्धन चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने श्रीरामाची महाआरती
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी श्रीराम मंदिर आकार घेण्यासाठी घेतलेली भूमिका व हिंदुत्ववादी विचाराला दिलेली ताकद यामुळेच आज राम मंदिर साकार होत आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले. कणकवली पटवर्धन चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामाच्या महाआरती प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. या महाआरतीला कणकवली पटवर्धन चौकात आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदीवे,राजू राणे, माजी नगरसेवक कन्हैया पारकर, रुपेश आंमडोसकर, अनुप वारंग, प्रमोद कावले, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व रामभक्त उपस्थित होते. यावेळी महारतीनंतर श्रीरामाचा जोरदार जय जयकार करण्यात आला.
दिगंबर वालावलकर /कणकवली





