शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगावच्या कुमारी रसिका सुर्यकांत धुरी व कुमारी सेजल शरद माणगावकर ग्लोबल फाऊंडेशनच्या ज्ञान ज्योती शिष्यवृत्ती च्या मानकरी

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी मार्फत गरीब व होतकरू विद्यार्थीनीसाठी ज्ञान ज्योती शिष्यवृत्ती योजना त्यांच्या शालेय गरजा पूर्ण करण्यासाठी राबविली जाते.चालू वर्षी विद्यालयातील इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या कुमारी रसिका सुर्यकांत धुरी व कुमारी सेजल शरद माणगावकर या दोन विद्यार्थ्यांनीचे प्रस्ताव ग्लोबल फाउंडेशन कडून मंजूर करून या विद्यार्थ्यांनीच्या बँक खात्यावर सुमारे रु.3600/- एवढी रक्कम जमा करण्यात आली.समाजातील गरीब व होतकरु मुलींना प्रोत्साहीत करण्यासाठी ग्लोबल फाउंडेशन मार्फत राबिविल्या जाणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे संस्था अध्यक्ष श्री प्रदीप प्रभूतेंडोलकर व संस्था सचिव श्री मुकुंद धुरी , संचालक तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सलीम तकीलदार यांनी कौतुक केले व “ज्ञान ज्योती” शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले. या कामी ग्लोबल फाउंडेशनचे श्री परब यांचे विशेष सहकार्य लाभले.





