म्हापसा पोलिस स्टेशनमधून तीन बेघर व निराधार युवक पणदूरच्या संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमःपणदूरः गोव्यातील म्हापसा टँक्सी स्टँण्ड येथे थंडीत कुडकुडणा-या तीन बेघर व निराधार युवकांना म्हापसा पोलीस स्टेशनद्वारे दि.२०/०१/२४ रोजी जीवन आनंद संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
सद्या सगळीकडे थंडीचा कडाका वाढला आहे.अशावेळी कोणाही बेघर व्यक्तीला निवारा आणि संसाधनां अभावी रस्त्यावरचे निराधार व वंचिततेचे जीवन जगावे लागू नये.यादृष्टीने म्हापसातील तीनही युवकांना संविता आश्रममधे दाखल करण्यात आले आहे.
रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी जीवन आनंद संस्था कार्यरत आहे. गोव्यातील म्हापसा शहरात थंडी ऊन वारा पावसात एकाही व्यक्तीला रस्त्यावरचे निराधार आणि वंचिततेचे जीवन जगावे लागू नये. जे रस्त्यावर निराधार आहेत. त्यांचे आश्रमद्वारे पुनर्वसन व्हावे. यासाठी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी गोव्यात संस्थेचे कार्य सुरू केले.
आजवर गोव्यातील ८० हून अधिक निराधार बेघर , निराधार वयोवृध्द , निराधार मानसिक व शारीरिक दृष्टीने आजारी व जख्मी व्यक्तींचे राहण्याचे मूळ पत्ते शोधून त्यांचे कुटुंब पुनर्मिलन आणि आश्रमद्वारे पुनर्वसन करण्यात आले आहे.
किसन चौरे
विश्वस्त
जीवन आनंद संस्था





