कणकवली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ 22 रोजी श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणे निमित्त कार्यक्रम

आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार महाआरती व कार सेवकांचा सत्कार
गोट्या सावंत व समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने आयोजन
22 जानेवारी 2024 रोजी अयोध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले जात आहे. त्यानुसार कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली मध्ये श्री शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ७.०० वाजता महाआरती करण्यात येणार असून त्यानंतर 1992 साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील नागरिकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर रात्रौ ९.०० वाजता प्रभू श्रीरामाच्या रामलीलांचे दशावतारी नाट्य सादर करण्यात येणार आहे. या ठिकाणी 21 फोटो उंचीची श्रीरामांची तात्पुरता स्टॅच्यू तयार करण्यात आला असून समीर नलावडे मित्र मंडळ व गोट्या सावंत मित्र मंडळ यांच्या वतीने येथे अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली