केईएम, टाटा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची व्यवस्था करा!

या महत्वपूर्ण मागणीसाठी कोकण सुपुत्र प्रमोद जठार यांचे मुंबईत उपोषण

मुंबई महापालिका आयुक्तांना दिले उपोषणाचे पत्र

माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो यावेळी तेथे दाखल झालेल्या रूणांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे माझ्या लक्षात आले., याबाबत मी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या होत्या. परंतु अदयापपर्यंत या गोष्टीकडे कोणीही गांर्भियाने पाहिले नाही.
मुंबईत केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल रूग्णांचे नातेवाईक कोकण व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोप-यातुन येत असतात. पण त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते फुटपाथवर झोपतात. त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्याता नाकरता येत नाही. कोविड सारख्या आजारामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक वायरल इनफेक्शन होऊन आजार पसरवू शकतात. यावर आपण मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पातुन सदर आजूबाजुला रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी महानगरपालिका प्रशासना मार्फत तरतुद करावी किंवा केईएम हॉस्पिटलच्या आवारात इमारत बांधावी व तशी तरतुद या 2024-25 अर्थसंकल्पात करावी. या गोष्टीकडे मुंबईकरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी 26 जानेवारी रोजी केईएम हॉस्पिटलच्या आवारात कार्यकर्त्यांसोबत लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!