युवा संदेश प्रतिष्ठान मार्फत करूळ, नागवे मधील अनेकांची मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया

ग्रामस्थांनी मानले युवा संदेश च्या संदेश सावंत, संजना सावंत यांचे आभार
नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची माहिती
युवा संदेश प्रतिष्ठान आणि नाटळ सांगावे विभाग भाजप यांच्या वतीने १७ डिंसेबर रोजी मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. त्यावेळी नागवे आणि करूळ गावातील गरजू आणि वयोवृद्ध ग्रामस्थां ची नेत्र तपासणी केली होती. आणि त्या ग्रामस्थांचे आज युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक गोट्या सावंत आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या मार्फत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अशा ग्रामस्थाच्या दृष्टी ला नवसंजीवनी मीळाली आहे. या सर्वांनी गोट्या सावंत व संजना सावंत यांचे आभार मानले आहेत. व त्यांच्या मुळेच आम्हाला दुष्टी मीळाली आहे असे मत व्यक्त करत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. अशी माहिती नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांनी दिली.
कणकवली प्रतिनिधी