आदर्श शिक्षक डॉ.पी.जे कांबळे यांना शिक्षण गौरव पुरस्काराने सन्मानित.

मराठी भाषातज्ञ अशी डॉ.पी.जे.कांबळे यांची ओळख.

कणकवली/मयुर ठाकूर

मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने देण्यात येणारा स्व.मारूती तुकाराम मुरकर यांचे स्मरणार्थ शिक्षण गौरव पुरस्कार मा. श्री.पी.जे. कांबळे . मुख्याध्यापक विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळा, कणकवली यांना ट्रस्ट चे अध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर यांनी जाहीर केला. मुख्याध्यापक कांबळे यांचे विद्यामंदिर माध्यमिक प्रशाळेचया शैक्षणिक प्रगती मध्ये भरीव कामगिरी केली आहे.एक शिक्षक म्हणून त्यांचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सुसंवाद ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी खूप मोठ योगदान आहे. यांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असे ट्रस्ट चे अध्यक्ष यांनी सांगितले.सदरचा पुरस्कार २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. जगदीश कातकर साहेब, प्रांताधिकारी याचे हस्ते देण्यात येणार आहे. श्री.कांबळे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!