कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत धोंड यांचे आवाहन

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित प.पू. अप्पासाहेब पटवर्धन माध्य. विद्यालय मांडकुली- केरवडेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

आज शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देणे अपेक्षित आहे,विद्यार्थ्यांनमध्ये गुणवत्ता आहे फक्त गरज आहे तो ओळखणं व व त्यानुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण आणि असं झालं तर निश्चितच आपल्या गावातूनही अनेक उच्च पदस्थ अधिकारी घडू शकतात यासाठी पालक- शिक्षक व विद्यार्थी यांची भूमिका महत्त्वाची आहे व संस्थेने त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे सांगतानाच आपण जर अपेक्षित काम केलं तर मदतीसाठी लोक स्वतःहून पुढे येतील असे अध्यक्ष स्थानावरून संबोधित करताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांवचे प्राचार्य व संगीत तज्ज्ञ प्रशांत धोंड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अमोघ चुबे माजी विद्यार्थी व सिव्हिल इंजिनिअर श्री परिमल मांडकुलकर, केरवडे शिक्षक भारती मालवण तालुकाध्यक्ष श्री संजय जाधव , मांडकुली सरपंच सौ. गौतमी कासकर ,केरवडे सरपंच सौ. श्रिया ठाकूर , मांडकुली उपसरपंच श्री तुषार सामंत संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर उपाध्यक्ष श्री कृष्णा भोई, कार्याध्यक्ष श्री तातू मुळीक सेक्रेटरी श्री अंकुश जाधव उप-सेक्रेटरी श्री निलेश सामंत उप-खजिनदार सौ. करिष्मा भोई संचालक श्री विलास घाडी ,श्री गिरीधर केरवडेकर ,श्री संतोष नार्वेकर श्री वामन गावडे श्री सतिश पडते श्री प्रकाश सावंत श्री नाईक डॉक्टर,संस्थेला वेळोवेळी आर्थिक सहकार्य करणारे उद्योजक श्री जगदीश वेंगुर्लेकर , शिक्षक- पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. मधुरा गोसावी माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री बाबाजी भोई बिबवणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व विद्यार्थी बक्षिस योजनेचे दाते श्री प्रकाश कुबल सर तुळसुली हायस्कूलचे प्र. मुख्याध्यापक श्री अनिल वारंग, श्री समीर लाडले मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन दिपप्रज्वलाने झाली.यावेळी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत मांडकुली यांच्या कडून देण्यात येणारी वस्तुरुपतील बक्षिसे तसेच दोन्ही गावातील दात्याकडून जाहीर केलेली रोख व वस्तुरूपातील बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली चालू वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून कु. शंकर पेडणेकर व आदर्श खेळाडू म्हणून कुमार निलेश हडपी व कुमारी सिद्धी मसुरकर यांची निवड करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘शब्दसुमने’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्धघाटक डॉ. अमोघ चुबे यांनी विद्यार्थ्यांना प्रयत्नात सातत्य ठेवा,आपल्यामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून ते वृद्धीगत करण्याचा प्रयत्न करा व यशस्वी व्हा असे या प्रसंगी सांगितले तर माजी विद्यार्थी व सिव्हिल इंजिनिअर श्री परिमल मांडकुलकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्यातील न्यूनगंड बाजूला करून यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवा व वडीलधाऱ्याच्या मार्गदर्शनाने पुढे जा असे सांगितले यावेळी बिबवणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व संस्था सचिव श्री प्रकाश कुबल यांनी प्रशालेच्या प्रगतीबद्दल विद्यालय व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.तसेच प्रसंगी श्री संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी व्यासपिठावरील मान्यवर श्री धोंड सर डॉ. श्री अमोघ चुबे, श्री परिमल मांडकुलकर, श्री प्रकाश कुबल सर, श्री संजय जाधव तसेच कलाक्षेत्रात योगदान देणारे श्री मयुर गवळी कु. भाविका खानोलकर ,श्री हरेश नेमळेकर ,श्री गोविंद मसुरकर श्री अक्षय कासले, श्री समिर लाडले तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणारे मुख्याध्यापक श्री खोत सर सहशिक्षक श्री सरवटे सर श्री गोवेकर सर सहा शिक्षका सौ रांगणेकर मॅडम सहशिक्षिक श्री राहूल कानडे सर शिक्षकेतर कर्मचारी श्री विश्राम जाधव व श्री संजय गोसावी यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर मुलांचे विविध गूणदर्शन कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मुलांनी “पाशुपत रामदर्शन” हे दशावतारीनाटक सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री खोत सर यांनी केलं तर पाहुण्यांचा परिचय संस्था अध्यक्ष श्री परशुराम नार्वेकर यांनी केला. कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन उपक्रमशिल प्राथामिक शिक्षक माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री बाबाजी भोई यांनी केले तर उपस्थीतांचे आभार संस्था सेक्रेटरी श्री अंकुश जाधव यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री अनिल गोवेकर यांनी केलं

साळगाव(प्रतिनिधी)

error: Content is protected !!