साकेडीत 1 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास कामांची आमदार राणेंच्या हस्ते भूमिपूजन

कामे वेळेत व दर्जेदार होतात का यावर माझा लक्ष असणार
आमदार नितेश राणेंचे भूमिपूजन प्रसंगी प्रतिपादन
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांमधून कणकवली तालुक्यातील साकेडी गावामध्ये अनेक विकास कामांची भूमिपूजन आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आली. साकेडी गावातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी शासनाच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी मंजूर करून आणला आहे. या कामामध्ये आज हुबरट – साकेडी रस्त्यावर पूल बांधणे 98 लाख, करूळ साकेडी रस्ता खडीकरण – डांबरीकरण 22 लाख, मुख्य रस्ता ते गवाणकर घरापर्यंत रस्ता खडीकरण – डांबरीकरण 5 लाख, मुख्य रस्ता ते मशीद रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख, जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजना वरचीवाडी, बोरीचीवाडी, फौजदारवाडी साठी 38 लाख, या 1 कोटी 78 लाखाच्या कामांची भूमिपूजन आमदार राणेंच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कामांचा दर्जा योग्य राखला गेला पाहिजे. गावातील लोक ज्या विश्वासाने आज येथे आले आहेत त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असेही आमदार नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. कामाचा दर्जा राखणे व काम वेळेत होणे या दोन्ही जबाबदाऱ्या माझ्या खांद्यावर आहेत. त्यामुळे येत्या काळात होणारी कामे ही वेळेत होत आहेत का व दर्जेदार होताहेत का यावर माझा लक्ष असणार असल्याचा शब्द मी यावेळी ग्रामस्थांना दिला असल्याचे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी साकेडी सरपंच सुरेश साटम, माजी सभापती संजय शिरसाट, उपसरपंच प्रज्वल वर्दम, माजी पंचायत समिती सदस्य अनघा देवरुखकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, संदीप सावंत, भाई आंबेलकर, परशुराम झगडे, दत्ता काटे, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, माजी सरपंच रीना राणे, ग्रामपंचायत सदस्य विशाखा राणे, प्रेरणा जाधव, सुविधा गुरव, सोसायटी संचालक कृष्णा सदवडेकर, माजी उपसरपंच पांडुरंग वर्दम, रामचंद्र लाड, सहदेव लाड, वसंत ढवण, संतोष परब, विनायक परब, यशवंत परब, मुरारी राणे, राजेंद्र परब, दाजी सदवडेकर, रवींद्र कोरगावकर, धोंडीराम शिरसाट, संदीप होळकर, मारुती शिरसाट, गणेश म्हसकर, राजू म्हसकर, विलास साटम, अजित शिरसाट, प्रकाश लाड, फ्रान्सिस भुतेलो, सुषमा साटम, बाळा परब, यांच्यासह अन्य ग्रामस्थ, भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी





