स.का.पाटील सिंधदुर्ग महाविद्यालयातआर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

अर्थनिर्मिती , NABCON, करीअर कट्टा आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात “अर्थ निर्मिती:आर्थिक साक्षरता कार्यशाळा” दिनांक १२व१३जानेवारी रोजी संपन्न झाली. 12 जानेवारी रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता या कार्यशाळेस सुरुवात झाली. याप्रसंगी व्यासपिठावर प्रशांत आवटी , असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, बिझनेस डेव्हलपमेंट -लर्निंग, चॉईस इक्विटी ब्रोकींग व विनय दालमिया, चॉईस एक्विटी ब्रोकिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शिवराम ठाकूर, अंतर्गत हमी कक्ष समन्वयक डॉ सुमेधा नाईक आणि नवीन शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ उज्ज्वला सामंत उपस्थित होते.याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. मुख्य मार्गदर्शक प्रशांत आवटी यांनी आर्थिक सजगतेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर सत्र घेतले. युवावर्गाला बचतीबाबत प्रोत्साहन देण्यात आले.मासिक १००रूपयांपासून आपण बचत करु शकतो. बॅंक व पोस्ट यांच्या विविध योजनांची माहिती याप्रसंगी मा. आवटी यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यांतील गुंतवणूक करताना असणारी जोखिम व त्यासाठी घ्यायची काळजी यांचे उत्तम व खेळीमेळीच्या वातावरणातील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रेरक ठरले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डाॅ. सुमेधा नाईक यांनी केले तर आभार डॉ.उज्वला सामंत यांनी मानले. 13 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना पॅन कार्ड,बॅक अकाऊंट उघडून देण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे पँन कार्ड नाही, त्यांचे कार्ड काढून दिले. तसेच ज्यांना शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, त्यांना DMAT accounts काढून दिली गेली. यासाठी प्रशांत आवटी, विनय दालमिया आणि त्यांच्या तांत्रिक विभागाच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी अर्थ निर्मिती पात्रता प्रश्न मंजुषा ऑनलाईन सोडवली, त्यांना प्रमाणपत्रे प्राप्त झाली. या कार्यशाळेचा लाभ महाविद्यालयाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि विज्ञान विभागाच्या सर्व विद्यार्थ्यानी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतला. या कार्यशाळेचे नियोजन डॉ उज्वला सामंत, डॉ सुमेधा नाईक आणि सर्व विभाग प्रमुखानी केले.





