चौर्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही

कोकण विकासासाठी मानवता संस्थेचे पंतप्रधानांना साकडे
सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी)
84 बंदरी ऐसा जागा दुसरा नाही शुद्ध खडक! स्थळ उत्तम! त्याच जागी बुलंद किल्ला वसवावा!!”असे उद्गार सिंधुदुर्ग किल्ला उभारण्यापूर्वी कू lरट्या बेटाकडे पाहून छत्रपती शिवरायांनी काढले होते हा सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या दृष्टीने विकासाचे मॉडेल बनू शकतो यासाठी कोकण विकासाचा जाहीरनामा देशाच्या पंतप्रधानांनी सरकारच्या विकास अजेंड्यावर घ्यावा असे आवाहन मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग मुंबई चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका निवेदनाद्वारे आवाहन करताना श्रीकांत सावंत यांनी म्हटले आहे की दुबई सिंगापूर मलेशिया प्रमाणे प्रचंड विकास क्षमता असलेला कोकण हा प्रदेश आहे कोकणातील सी वर्ल्ड प्रकल्प हा मार्गी लागल्यास जगाच्या नकाशात देशाबरोबर कोकणची ही एक वेगळी ओळख निर्माण होईल सावंतवाडी रेल्वे टर्मिनस वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग तसेच असलेली विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लागावे याबाबत जालना मिळण्याची गरज आहे आंतरजिल्हा मार्ग हे कोकणच्या पर्यटन विकासाच्या धमन्या आहेत मालवण वेंगुर्ला देवगड यासारख्या बंदरांमध्ये फार मोठी विकास क्षमता आहे त्याचे दूरगामी नियोजन करायला हवे केवळ समुद्रकिनाऱ्यापूर्ती पर्यटन िकास मर्यादित नसून कोकणच्या सह्या पट्ट्यात सुद्धा मोठी पर्यटन विकासाची क्षमता आहे याबाबत चालना मिळण्याची गरज आहे माननीय पंतप्रधान नौसेना दिनानिमित्त मालवणात आले होते कोकणचे सौंदर्य त्यांनी पाहिले आहे सरकारच्या विकास अजेंड्यावर खास स्थान मिळाल्यास कोकण देशातील एक अग्रगण्य मॉडेल प्रदेश म्हणून ओळखले जाईल असेही मानवता विकास संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात श्रीकांत सावंत यांनी म्हटले आहे